slider 1
slider 2
slider 3
सिमेंट निरधूर चूल
1)पारंपारिक चूलींच्या मानाने निम्मेच जळण लागते.
2) जळण आणण्यासाठी लागणारा वेळ व पैसा हयांत बचत होते.
3) चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते.
4) चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धूरडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामूळे धूराने डोळयाना व छातीला होणारा त्रास कमी होतो,
त्यामूळे आरोग्य चांगले राहते.
5) भांडी कमी काळी होतात.
6) चूल उत्तम पेटत असल्यामूळे फूंकणीने फूंकण्याचे श्रम वाचते.
7) लाकूडफाटयाव्यतीरिक्त लाकडाच्या छोटया ढलप्या, गोवर्या, बूरकंडे काटक्याकटक्या असे सर्व प्रकारचे जळण या चूलीत उत्तम पेटते.
8) हि चूल पारंपारीक वैलाच्या चूलीसारखी दिसत असल्याने महाराष्ट्रातील महिलांच्या पसंतीस उतरते. चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा
मावणारी असते.