शहाणेदिवान सिमेंट आर्टीकल्स हि कंपनी सन 1990 साली सुरू झाली
कंपनिचे मालक श्री शब्बिर गलाब शहाणेदिवान यांनि हि कंपनि सूरू केली गवंडी काम केलेला हा माणूस याने सिमेंट च्या वस्तु कशा बनवील्या जातील यावर सतत अभ्यास केला व आपली कंपणी अगदी लहान प्रमाणात सूरू केली.
सूरवातीला पारंपारीक पध्दतीने सीमेंट चे पोल, सीमेंट विटा काडण्यास सूरवात केली. त्यावेळी मशनरी या अवगत नव्हत्या. जसे अपले जग बदलत गेले तसे आपल्या कंपनीने आपल्यात बदल घडवत आनले.
आपल्या पारंपारीक वस्तू कश्या सिमेंट मध्ये बनवता येतील याच उत्तम उदाहरण म्हणजे सिमेंटच्या पारंपारीक चूलींना सिमेट निरधूर चूली बनवली.
पूर्वी आपल्याकडील घरांना लाकडी चौकट होत्या त्यात नंतर बदल घडउन दगडी चौकट बनवण्यास सूरवात झाली. सूरवातीस कंपनीचे मालक हे गवंडी असल्याने दगडाचे चौकट हि घडवत होते व त्या वेळी त्यांना कल्पना आली कि आपल्या भागात सिमेंट चौकट हि लोकांना परवडनारी व दिसण्यास आकर्षक असलेली व बसविण्यास सोपी असलेली लोकांच्या पसंतीस पडेल. त्याच गोष्टीवर विचार करून आपली कंपनीने सिमेंट चौकटी तयार करण्यास सूरवात केली व तसेच सिमेंट पोल व सिमेट विटा अश्या वस्तु तयार करण्यास सुरवात केली.
अगदी छोटया प्रमाणात चालू केलेली हि कंपनी लोकांच्या पसंती आली कि आज आपल्या कंपनीत याचे मोटया प्रमाणावर उत्पादन होत आहे.
सन 1998-99 साली महाराष्ट्रात ग्रामीन स्वच्छता कार्यक्रमात कंपनीणे सहभाग घेउन उत्कृष्ट कामगीरी केल्या बद्दल कंपनीचे मालक श्री शब्बिर गूलाब शहाणेदिवान यांना पाणी पूरवठा व स्वच्छता विभाग सांगली यांच्या मार्फत दि 1 मे 1999 रोजी जिल्हाअधीकारी व ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता आणी भटक्या व विमुक्त जाती व इतर मागास वर्ग कल्याण, महाराष्ट्र शासन, मुंबई. मंत्री मा. आन्नासाहेब डांगे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले.
आज आपल्या कंपनीत सीमेंट चे खलील प्रमाणे वस्तु उत्पादन व विक्री केल्या जातात.
1) सिमेंट विटा 2) पेव्हर ब्लॉक 3) सिमेंट गार्डन बॅंच 4) कंपाउंड पोल 5) शेड पोल 6) मार्किंग पोल 7) साधी चैकट 8) मोल्डींग चैकट 9) नागपूरी चैकट 10) अॅकरेलीक चैकट 11) सिमेंट खिडकी 12) सिमेंट निरघूर चूल 13) सिमेंट साध्या चूली 14) चूलीची पाईप 15) शोष खडयाची टाकी, 16) सिमेंट पाण्याची टाकी 17) वॉश वाळू 18) क्रश वाळू 19) ग्रीट पावडर 20) सर्व प्रकारची खडी 21) सिमेंट 22) चौकट वरील कोंकरीत छावणी 23) सिमेंट कूंडी 24) गार्ड स्टोन